- तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- दोन मुले आणि वडील अशा तिघांनी चारचाकी वाहन भाडेतत्त्वावर घेतले. त्याबाबतचा भाडे करारनामा केला. त्यानंतर वाहनमालकाला त्याची चारचाकी, तसेच ठरलेले भाडे दिले नाही. याप्रकरणी तिघांच्या विरोधात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला.
हा प्रकार लांडेवाडी भोसरी येथे घडला. मुकुंद गजानन ताजणे (वय ४८, रा. दत्तनगर, दिघी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १२ जून) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हार्दिक सोपानराव बेलेकर (वय २७), गौरव सोपानराव बेलेकर, सोपानराव बेलेकर (तिघेही रा. शेलारवस्ती, देहू – आळंदी रोड, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपींनी फिर्यादीची चारचाकी गाडी भाडे तत्त्वावर घेतली होती.
















