- एकाला लुटले तर, वाह्नाचीही मोठी तोडफोड; दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळ आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून वडिलांच्या खिशातून ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर रिक्षाची (एम एच १२ / एफ झेड ६४११) तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर आरोपी हवेत कोयते फिरवत दहशत पसरवून निघून गेले.
फिर्यादी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना लिंक रोडवरील पुलाखाली एक लाल रंगाच्या कारची (एम एच १४ / ए पी ४८३९) देखील तोडफोड झाल्याचे दिसले. त्या कारचीही आरोपींनी तोडफोड केल्याचे फिर्यादी यांना समजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार रविवारी (दि. १३) रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान पत्राशेड झोपडपट्टी, लींकरोड, चिंचवड येथे घडला.
याबाबत कोमल बाबु खैरारिया (वय २४, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण पवार, अविनाश साळवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित उर्फ जाड्या साळवे (सर्व रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















