- प्रदेशाध्यक्षा सलगरांकडून पदाधिकाऱ्यांना काम सुरु करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील युवतींची आढावा बैठक नुकतीच पार पडली. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा व प्रभागनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीचे नियोजन युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केले होते.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण मंडळाचे मा. सभापती फजल शेख़, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगाताई धेंडे, जन्नत सय्यद, सपना घाडगे, रविराज काळे, गणेश ,विशाल सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. नेहा पडवळ (भोसरी विधानसभा युवती आध्यक्ष), लालबी शेख़ लोखंडे( पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष), श्वेता पाटे, मानसी गोफने,राजश्री अहिरे, मनाली कुटे,भव्यशीला गायकवाड, भाग्यश्री खोब्रागडे,अंकिता साळवे यांची प्रभाग अध्यक्ष तर छाया घाडगे ,अमृता घाडगे यांची वाॅर्ड अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सक्षणाताई सलगर म्हणाल्या, राष्ट्रवादी अभिप्राय अभियाननामधे राज्यात युवती सेलमध्ये वर्षा जगताप व त्यांच्या युवती टीम ने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच सुशिक्षीत तसेच तरुणवर्ग राजकारणात सक्रिय होणे ही काळाची गरज आहे युवतींनी तळागाळापर्यंत जाऊन पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे. राज्यात पिंपरी चिंचवड शहराच्या युवतींचे काम अतिशय चांगले असून संघटनात्मक बांधणी देखील अतिशय उत्तम आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या.
संजोग वाघेरे पाटिल म्हणाले की, वेळोवेळी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पक्षाचे सक्रिय कार्य युवती संघटनेच्या माध्यमातून होत असते. कोरोना काळात देखील गरजू लोकांना धान्य वाटप, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत, सॅनिटाइझर स्टँड वाटप, घरकाम महिलांसाठी दिवाळी फराळ भेट असे कौतुकास्पद काम युवतींनी केले.
युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी सुशिक्षीत युवतींची प्रभागनिहाय व वाॅर्ड अध्यक्ष अशा निवडी करण्यात आलेल्या आहेत. संघटन मजबूत होण्यासाठी विशेष प्रयत्न व बैठका घेणार आहे, असे सांगितले.
–
















