न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड ह्याची श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून भारतीय संघात निवड होणारा ऋतुराज गायकवाड हा पहिला खेळाडू ठरला आहे.
त्या निमित्त शहराच्या प्रथम महापौर या नात्याने माई ढोरे यांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडील समवेत ऋतुराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अरविंद ढोरे, जवाहर ढोरे, कु. ज्ञानेश ढोरे उपस्थित होते. ऋतुराज हा सांगवीतील मधुबन सोसायटीत वास्तव्यास आहे
















