- वृक्षारोपण, रक्तदान शिबीर व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप..
- शहराध्यक्ष सचिन चिखलेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. दीड लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होत. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरात मनसेने राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस साधेपणाने परंतु, लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा केला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले, शहर सचिव तथा पालिका कर्मचारी सेना अध्यक्ष रूपेश पटेकर, उप शहराध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, विशाल मानकरी, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, प्रतीक शिंदे, स्वप्निल महांगरे, गणेश उज्जनकर, बालाजी पांचाळ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, अमर माळी, महिला सेना अध्यक्षा अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, महिला शहर सचिव सिमा बेलापुरकर, संगिता देशमुख, विधी व जनहित कक्ष अध्यक्ष राजु भालेराव, राजेश अवसरे, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी आदी उपस्थित होते
दरम्यान निगडी-राहुलनगर या ठिकाणी डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत ४० वृक्षांचे रोपण करण्यात आले. जनहित व विधी कक्ष यांच्यावतिने चिंचवड गावठाण या ठिकाणी गोशाळामध्ये चारा दान करण्यात आला. प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळे प्रभागात कोरोना योध्दा कार्यक्रम घेण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले. चिंचवड बिजलीनगर परिसर या भागांत प्रभाग अध्यक्ष अक्षय नाळे व मित्रपरीवार यांच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले. महिला सेना यांच्या वतिन मौनिबाबा अनाथ आश्रम या ठिकाणी अनाथ महिला यांना साहित्य वाटप करण्यात आले. चिंचवड मोहननगर परिसर या ठिकाणी दत्ता देवतरासे विभाग अध्यक्ष पिपरी विधान सभा यांच्या वतिन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना यांच्या वतिने काळभोर नगर चिंचवड येथील मदर टेरेसा अनाथाश्रम येथे ५० किलो साखर, धान्य,मसाले, लाडू आणि हॅन्ड ग्लोज इत्यादी वाटप करण्यात आले. पिपंरीतील HA कॅालनी येथे सुमित कलापुरे व मित्र परिवार यांच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले. पिंपरी महात्मा फुलेनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले
















