- वेश्या व्यवसायप्रकरणी एकाला अटक; एका महिलेची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- पिंपरीतील भाजी मंडई परिसरातील सृष्टी स्पा इथे सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान कलम ३७० (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १४) दुपारी करण्यात आली.
याबाबत पोलीस नाईक जमीद तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय शरद भालेराव (वय २३, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















