- कोविडपासून बालकांच्या रक्षणासाठी पालिकेकडून वातावरण तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यादृष्टीने पिंपरी – चिंचवड महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. मुले आनंदी राहावीत, मुलांची करमणूक व्हावी, यासाठी रुग्णालयातील भिंतीवर डॉरमॉन, मोगली प्राण्यांचे कार्टून साकारले आहेत. विरंगुळ्यासाठी विविध खेळणीही ठेवली आहेत.
पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात लहान मुलांसाठी ५० आणि पालकांसाठी ५० असे १०० बेड तयार केले आहेत. यामुळे मुलांचे उपचाराला सहकार्य मिळेल. मुले घाबरणार नाहीत, असे जिजामाता रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी सांगितले.
लहान मुलांना पालकांसह रुग्णालयात राहता येईल असे नियोजन केले जात आहे. लहान मुलांकरिता वायसीएममध्ये ऑक्सिजनचे १५०, आयसीयूचे ३० बेड तयार केले जाणार आहेत. त्यातील नवजात बालकासाठी १७ आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १५ बेड राखीव असतील.
















