न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- वाकडमधील १३ रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकव -ण्यासाठी व नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकडच्या म्हातोबानगर येथे रिक्षा चालक वारंवार बजावून देखील रिक्षा उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करतात. याचा राग मनात धरून गुरुवारी मध्यरात्री आरोपीने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.
















