- सहा जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- जमिनीच्या वादातून आरोपी व त्यांच्या मुलाने फिर्यादी यांचा मुलगा आणि पतीला सिमेंट ब्लॉकने व बांबूने मारहाण करून जखमी केले. आरोपींनी फिर्यादी यांचे केस पकडून त्यांना खाली पाडले. तसेच हाताने मारहाण केली.
आरोपीच्या एका मेहुणीने फिर्यादी यांच्या मुलाच्या नाकाजवळ, पाठीवर बोचकरून छातीवर चार ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १३) दुपारी आदर्श कॉलनी, वाकड रोड, वाकड येथे घडली.
आशा दिलीप कलाटे (वय ५०, रा. ननावरे वस्ती, बाणेर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबर चांद शेख (वय ६०), सोहेल बाबर शेख (वय २१), बाबर शेखची पत्नी आणि बाबर शेख यांच्या तीन मेहुण्या (सर्व रा. आदर्श कॉलनी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















