- सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने दिवसाआड सुरू राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- पिंपरी बाजारपेठेत शहरात सम – विषम तारखेस दुकाने सुरू करण्याची कार्यवाही पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
पिंपरी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सोमवार दि. १४ जूनपासून पिंपरी बाजारपेठेत सम-विषम तारखेस दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यास पिंपरीतील व्यापा-यांनी विरोध केला होता. सम – विषम नियोजन करू नये, पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना पूर्णवेळ दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पिंपरी मर्चट फेडरेशनकडून मागणी केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता दुकानदारांनी घेणे गरजेचे आहे. दुकाने सुरू ठेवताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अति. आयुक्त विकास ढाकणे यांनी केले आहे.
















