- तिघांकडून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- ‘तू भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास का आला होता? भिकाऱ्या तुझी लायकी आहे काय’, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले.
‘तू आमच्या नादी लागू नको. तुला खाल्लास करून टाकू’, अशी आरोपींनी धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. १४) रात्री नाणेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव येथे घडली.
सतीश एकनाथ नाणेकर (वय ५०, रा. नाणेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश सुरेश वाघेरे, राजेश सुरेश वाघेरे, सुशील श्रावण मोहन (सर्व रा. नानेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.