न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- चिखलीतील दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्षा मंगलताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. गोशाळेस चारा वाटप, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना धान्यवाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
चिखली रामदासनगर येथील श्री लांडगे महाराज यांच्या गोशाळेतील गोमातांसाठी तसेच पांजरपोळ गोशाळेतील गोमातांसाठी चारा वाटप केले. प्रभाग क्रमांक दोनमधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना गहू, तांदूळ, डाळ, साखर, खाद्यतेल वाटप केले. तसेच गरिबांना मदत केली. यावेळी आमदार भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.