- सहा जणांना अटक; पिंपरी कोर्टातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- दोन टोळ्या शिवाजीनगर कोर्ट तसेच शहरातील विविध कोर्टात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देत होत्या. त्यात आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे व इतर कागदपत्रांचा समावेश होता. बनावट व बोगस कागदपत्रे पिंपरी कोर्टात बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ बाळगली होती.
या प्रकरणी एका खटल्यात पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सुनील मारुती गायकवाड (वय ५२, रा. चावडी चौक, आळंदी), नंदा एकनाथ थोरात (वय ४३, रा. इंद्रायणी नगर, आळंदी), पौर्णीमा प्रशांत काटे (वय ३०, रा. इंद्रायणी नगर, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर दुसऱ्या खटल्यात पोलीस शिपाई उमेश वानखडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलमान ताजुद्दीन मुजावर (वय २४), समाधान प्रभाकर गायकवाड (वय २३), श्रीधर मगन शिंदे (वय २३, सर्व रा. काटे चाळ दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) रोजी पिंपरीत घडली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















