- मुलगी गरोदर; बिजलीनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- अल्पवयीन मुलगी व आरोपी हे एकत्र हॉलमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली.
मात्र मुलगी आठ आठवड्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना १५ एप्रिल २०२१ रोजी बिजलीनगर येथे घडली. याबाबत १६ जून २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आदित्य संभाजी हरेगावकर (वय २१, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. हरेगाव, पोस्ट अटाळा, ता. धर्माबाद, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















