- डाॅक्टर व पत्नीच्या गळ्याला हत्यार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले. अन्य काही जण घराबाहेर थांबले होते. डाॅक्टरचा बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावली.
त्यांचे हात पाय बांधून घरातील ५० लाख रुपये रोख व १६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा साधारण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरून फरार झाले.
लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र चोरटयांनी दरोडा टाकला. घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.