- फोटो द्या अन्यथा नावे वगळणार; मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- पिंपरी विधानसभा मतदार संघातील १८ हजार २५६ मतदाराचे फोटो दिसून येत नाही. ही यादी मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे.
या यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी आपले फोटो सात दिवसांत उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण ३९९ यादी भागातील १८ हजार २५६ मतदारांचे फोटो यादीमध्ये दिसून येत नाहीत . या मतदारांनी आपली नावे यादीत कायम ठेवायची असल्यास, त्यांची छायाचित्रे व रहिवास पुराव्यासह पिंपरी विधानसभा मतदार संघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण येथे आठ दिवसांत समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आणून देण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या मतदारांची नावे यादीमधून वगळण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.