- भोसरी पोलिसांनी बांधल्या आरोपींच्या मुसक्या..
- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बँकांनाही तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- भोसरी पांजरपोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी धाड घातली होती. चक्क एटीएम मशीनच फोडल्याची घटना घडली होती. ही घटना गुरुवारी (दि. १०) रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेचा भोसरी पोलीस करीत होते.
दरम्यान पांजरपोळ येथील ‘एसबीआय’चे एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह २२ लाख ९५ हजार ६०० रुपयांची रोकड पळवणा-या टोळीला भोसरी पोलिसांनी हरियाणात जाऊन अटक केली.
अरविंद विद्याधर भिडे (वय ५८, रा. सहकार नगर, पुणे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अकरम दीनमोहम्मद खान (वय २३, रा. मु. बदोपुर, पो. रावली, तहसील फिरोजपुर झिरका जि. नुहु (मेवात) राज्य हरियाणा), शौकीन अक्तर खान (वय २४, रा. मु. बदोपुर, पो. रावली, तहसील फिरोजपुर झिरका जि, नुहु (मेवात) राज्य हरियाणा), अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर, वय ४६, रा. रहाडी, ता. तौरू, जि. नुहु राज्य हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँका संस्थेची नेमणूक करतात. संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे एटीएम फोडण्याच्या घटना घडतात. बँकांनी नवीन एटीएम सुरू करताना त्याची पोलिसांकडून परवानगी घ्यावी. या घटनेत संबंधित संस्थेचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. त्यामुळे त्यांनादेखील या प्रकरणात सहआरोपी केले जाणार आहे.
– मा. कृष्ण प्रकाश – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त…