न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- शिवसेनेचे भोसरी विधानसभा शहर संघटक तथा महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात यांचा वाढदिवस कोरोनाच्या अनुषंगाने साधेपणाने साजरा करण्यात आला.
प्राधिकरण येथील ब्रम्हदत्त विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेचे जोशी सर, सहशिक्षक महेंद्रसिंग शेखावत, त्रिंबक पटाईत, चेतन सावंत, वैभव थोरात, अवदुत जाधव पालक, शिक्षक उपस्थित होते.