- अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाईला सामोरे जा – पालिका आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- कोरोना काळात लूट करणाऱ्या रुग्णालयांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून खासगी १४ रुग्णालयांना नोटीस दिली आहे. तसेच पंधरा दिवसात वाढीव बिलांचे परतावे द्यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने निर्धारित केलेले दरच आकारावेत. असे सूचित केलेले असताना अधिकचे बिल घेतली. रुग्णालयांनी याबाबत कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयांनी तातडीने परतावे द्यावेत, कारवाई टाळावी, असे आवाहन डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका यांनी केले आहे.