- बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, खाते व फेरफार मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- राज्याच्या महसूल विभागाने आपल्या नव्या संकेतस्थळासाठी ५२ बँकांशी करार केला. आता या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होंणार आहे.
राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार- यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पंजाब व सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, सिडको-महाराष्ट्र बँक – इत्यादी अनेक बँकांचा समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच खासगी बँकांमध्ये कोटक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक आहे.
कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे,तसेच नंदुरबार, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर आणि नाशिक या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे असे राज्य शासनाने सांगितले.











