- पिंपरीतील नविन जिजामाता रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, एखादी व्यक्ती आधीच परदेशी शैक्षणीक संस्थांमध्ये शिकत आहे आणि शिक्षण चालू ठेवण्यासाठी संस्थेत परत जाणे आवश्यक असणारे विद्यार्थी, परदेशी रोजगारासाठी / मुलाखतीसाठी जाणारे नागरिक तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी जाणारे खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना कोविड १९ लसीचा पहिला व दूसरा डोस देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation latter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर लेटर तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे लेटर असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि. १९ जून २०२१ रोजी नविन जिजामाता रुग्णालय, पिंपरी येथे कोविड १९ लसीकरण सकाळी-१० ते ०५ या वेळेत करण्यात येणार असून लसीकरणासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे.