- चोरट्याने दुचाकीसह लाखाचा ऐवज लांबविला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी (एम एच १४ / ई एक्स २१८२) आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख नऊ हजाराचा ऐवज चोरून नेला.
ही घटना गुरुवारी (दि. १७) पहाटे चोविसावाडी येथे उघडकीस आली. रणजीत अभिमान गायकवाड (वय ४८, रा. चोविसावाडी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. दिघी पोलीस तपास करीत आहेत.