- शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन शहरात साधेपणाने साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन आकुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, कामगार नेते इरफान भाई सय्यद, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे, शहर संघटिका ॲड. उर्मिलाताई काळभोर,युवा अधिकारी विश्वजीत बारणे, सरिता साने व शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०२२ मध्ये होणा-या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीत मनपा भवनावर भगवा फडकवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सर्वांनी एकजुटीने व्यूहरचना करुन योग्य रणनीती वापरून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा असा निश्चय व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात येतील. शहरवासियांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. शहर शिवसेना या शहरातील लोकांचे हित जपण्याचं काम इथून पुढे करेल, असेही ॲड. सचिन भोसले म्हणाले.