- राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भीमगर्जना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत पुढील वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच महापौर झाला पाहिजे, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी केला आहे. राष्ट्रवादी हा फक्त पक्ष नसून राष्ट्रवादी एक विचारधारा आहे.
महिला भगिनींचा सन्मान ठेऊन सर्व सामान्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
शुक्रवारी (दि. १८ जून) काळभोर नगर, येथे शहर राष्ट्रवादीच्या ‘निर्धार मेळाव्यास’ संबोधित करताना रुपाली चाकणकर बोलत होत्या. ज्या – ज्या महापालिका यापुर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्या त्या सर्वमहानगरपालिकांमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचा महापौर व्हावा यासाठी पक्ष संघटना सक्षमपणे उभारुन व्युहरचना केली जात आहे. यामध्ये महिला संघटनेवर विशेष जबाबदारी आहे. आज पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारीणी जाहिर झाली हा त्याचाच एक भाग असल्याचेही त्या म्हणाल्या.