न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बापट यांची पंढरपूर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागी शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
नगरविकास विभागाने नुकतीच त्यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत पदोनतीने उपायुक्त या पदावर बदली केली आहे, महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दुजोरा दिला आहे.


















