न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- व्हाट्सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ ते १८ जून २०२१ दरम्यान सांगवी परिसरात हा प्रकार घडला.
याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९९७५६१८३४२ या मोबाईल क्रमांकधारक अज्ञात इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय भोसले करीत आहेत.