न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा आता पूर्ववत होऊ लागली आहे. ई बसेस धावू लागल्या आहेत.
निगडी आगारातून बुधवारी (दि. १६) विविध चार मार्गावर १३ बस सोडण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. जून महिन्यात आता विविध मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
बुधवारपासून ई – बस धावू लागल्या आहेत. निगडी आगारातून भेकराईनगर, शेवाळवाडी, पुणे स्टेशन व हिंजवडी या चार मार्गावर बस मार्गस्थ झाल्या. या बसला ७५ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती आगारातून देण्यात आली.