- सहा जणांविरोधात पोलीस चौकीत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- महिला राहत असलेली जागा बिल्डरला देत नाहीत, या कारणावरून आरोपी त्यांच्या घरात घुसले. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली.
किवळे येथे रविवारी ही घटना घडली. महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर मनोहर तरस, बाळू तरस, संजय तरस, सागर तरस, साहिल तरस, अजय धिडे, अशी आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.