- भोसरीतील घटना; एक पिस्तूल, चार काडतुसे व एक मॅक्झिन जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- तीन तरुण हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी कारवाई करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन असा ३४ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला.
भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
योगेश शिवाजी दाभाडे (वय २२), निलेश पुंडलिक चव्हाण (वय २१), जगदीश बाळू शेळके (वय २१, तिघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.