न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधील राष्ट्रीय सेवा योजना व शारिरीक क्रीडा विभाग यांच्या वतीने ‘जागतिक योग दिनानिमित्त योगासन‘ व त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सूचनेनुसार व प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्या मार्गदर्शनखाली सदर कार्यक्रम नियमानुसार पार पडला. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक सलोनी जाधव यांनी सहभागी प्राध्यापकांना सिद्धासन, सुर्यनमस्कार, वज्रासन, पद्मासन, वृक्षासन, भूजगासन, शवासन आदीचे प्रात्यक्षिकाबरोबर व सखोल माहिती देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक सलोनी जाधव म्हणाल्या, योगा नियमितपणे केल्यास शरीर आणि मनाची शुद्धी करण्यासाठी फुफ्फुस, अन्ननलिका, श्वासनलिका यांना व्यायाम घडतो. प्राणायनामुळे चिंता, भितीही नाहीसी होते. शरीर निरोगी राहून अनेक आजारापासून मुक्ती मिळते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे आरोग्याचे महत्व अनेकांना पटू लागले आहे. डॉ. देखील अनेकांना नियमित योगासन करण्याचे सल्ले देतात. यावेळी प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद इंगळे यांनी तर, आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजनांचे प्रमुख डॉ. अरविंद बोरगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिभा ज्युनिअर महाविद्यालयामध्ये उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग दिन साजरा केला. अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन योगाचे प्रात्यक्षिके दाखवून साजरा केला या योग दिनानिमित्त नियमित योगा करण्याचे आव्हान उपप्राचार्या वनिता कुर्हाडे यांनी उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिला