- जवळपास सोळा लाखांचा आर्थिक दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कोविड मार्शलचे लक्ष आहे. त्यासाठी ३०० कोविड मार्शलची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांत तीन हजार नागरिकांकडून पंधरा लाख ऐशी हजार दंड वसूल केला आहे.
महापालिका परिसरात नियम शिथिल झाले आहेत. मात्र, मास्क वापरणे अपरिहार्य आहे. काही जण अद्यापही नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी, कोविड प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याबरोबरच, बेजबाबदार विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी ४८० कोविड मार्शलांची नेमणूक केली आहे.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, शहरातील बाजारपेठा, मंडई, गर्दीची ठिकाणे, रहदारीचे रस्ते आदी ठिकाणी पथके लक्ष ठेवणार आहेत.
शहरात विनामास्क फिरणा-या नागरिकांना समज देऊन, त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करणे सुरु आहे. त्याचप्रमाणे निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास, दुकानदारावरही कारवाई सुरू आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे संपूर्ण शहरात १६० पथके तयार करण्यात आली आहेत. दहा दिवसात तीन हजार जणांवर कारवाई केली आहे.