- बोपखेलमधील घटना; दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी प्रतिनिधी (दि. २२. जून. २०२१) :- फिर्यादीनी आरोपीच्या घराबाहेर मुरूम टाकला. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपीच्या मुलाने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली.
ही घटना सोमवारी (दि. २१) दुपारी गणेशनगर, बोपखेल येथे घडली. पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जंगबहादुर श्रीमोतीचंद यादव (वय ५२) आणि त्याचा मुलगा (दोघे रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.