न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी प्रतिनिधी (दि. २२. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये दि. ०१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
उद्या बुधवार दि.२३ जून २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि.२३ जून २०२१ रोजी बंद राहतील.