- वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- चऱ्होली व मोशीत जमीन देतो, असे सांगून एकाने फिर्यादीकडून सुरुवातीला पाच लाखांचा धनादेश घेतला. जमीन खरेदीसाठी नंतर आणखी ३५ लाख रुपये घेतले.
पैसे घेऊन आरोपीने फिर्यादीला जमीन दिली नाही. फिर्यादीने पैशाची मागणी केली असता आरोपीने मारण्याची धमकी दिली. ही घटना २०१४ ते २१ मे २०२१ या कालावधीत विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
विनोद किशनचंद मतानी (वय ४१, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद अमरनाथ लोणकर (रा. स्पाइन रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















