- नागरिकांमध्ये वाढतोय असंतोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जून. २०२१) :- निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल तसेच वर्तुळाकार रस्ता असा सुमारे ९० कोटी खर्चाचा एकत्रित प्रकल्प राबवण्यात आला आहे. मात्र अद्यापही वाहतुकीसाठी पूल खुला होत नसल्याने नागरिकांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे.
विलंबामुळे या मार्गावरून दररोज जाणाऱ्या लाखभर वाहनस्वारांना दीड ते अडीच किलोमीटरचा वळसा पडतो आहे. या रहदारीचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे.
निगडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटन कार्यक्रमाविषयी अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती पालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.


















