न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्या व बेशिस्त नागरिकांवर पालिकेने कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मास्क उपलब्ध करून दिला जात आहे.
निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास दुकानदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक याप्रमाणे संपूर्ण शहरात १६० पथके तयार करण्यात आली आहेत.


















