- स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव..
- पालिकेच्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या गुरुवारी (दि. २४) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या ५० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ५० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, संजयकाळे सभागृह, इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, साईअंब्रेला,संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता), घरकुल दवाखाना चिखली, पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली, पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर, प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एस.एस.अजमेरास्कुल, अजमेरा, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयनीनगर, भोसरी, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, आदिशक्ती हॉस्पीटल, भोसरी, पिं.चिं. मनपा. शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, सखुबाई गार्डन, भोसरी, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय, दिघी(सी एस एम), पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली, पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, कासारवाडी दवाखाना, निळुफुले नाटयगृह, सांगवी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३, भाटनगर दवाखाना पिंपरी, पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे, मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड, सेक्टरनं.२९, भोंडवे कार्यालयाजवळ, पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखाना या ४५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २००, १०० व ५० लाभार्थ्यांच्या क्षमतेने हा डोस मिळेल.
तसेच कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना व एचसीडब्ल्यू/एफएलडब्ल्यू यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर), आर.टी.टी.सी सेंटर, स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, तळवडे समाज मंदीर शाळा, पिं.चिं. मनपा. शाळा, खराळवाडी, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी, क्वालिटी सर्कल, भोसरी, गंगोञी पार्क,दिघी, गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी, शंकुतला शितोळे शाळा, वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी, बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी, पि.चि. मनपा शाळा, वाकड, .चिं.मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग, पिं.चिं. मनपा. शाळा रहाटणी, मनपा शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे अश्विनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड, मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या १९ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या दि.२४/०६/२०२१ रोजी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉटबुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.


















