न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- पूर्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर, घरकुल, शिवतेजनगर परिसरातील महिलांनी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वटसावित्री पोर्णिमेनिमित्त आज गुरुवारी वटवृक्षाची पूजा केली.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना तुळशीचे व गुलाबाच्या रोपांचे व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रा. हरीनारायण शेळके, महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तौडकर व पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.

















