- पालिकेच्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवारी (दि. २५) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ९० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,कासारवाडी दवाखाना, निळु फुले नाट्यगृह सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, भाटनगर दवाखाना, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनीक पिंपळेसौदागर, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या ४४ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २००, १००, ३०० व ५० लाभार्थ्यांच्या क्षमतेने हा डोस मिळेल.
तसेच कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना व एचसीडब्ल्यू/एफएलडब्ल्यू यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने हेडगेवार जलतरण तलाव, आरटीटीसी सेंटर, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, महापालिका शाळा खराळवाडी, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा रहाटणी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, अश्विनी मेडिकल फाउंडेशन आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या १८ लसीकरण केंद्रावर २००, ३००, १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या दि.२५/०६/२०२१ रोजी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉटबुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ८.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
















