- कार्यक्रमाचे थेट प्रसारण पालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरु होणा-या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून केले जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता शाहीर रामानंद उगले सादर करतील. यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता आणि संस्कृतीचे माहात्म्य दर्शविणारा “महाराष्ट्राची परंपरा” ही कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक लिंक वर करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांचा घरबसल्या लाभ द्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.
















