- डीपी रस्त्याबाबत नियोजनच्या आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. नगरसेवक नाना काटे यावेळी उपस्थित होते.
पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्रमांक ३५१ मधील योगा पार्क उद्यान, १८ मीटर कुणाल आयकॉन रोड, तसेच मिलिटरीचा १८ मीटर रस्ता आदी विकास कामांची पाहणी करण्यात आली. कुंजीर चौक येथे मिलिटरी रोड व कुणाल आयकॉन रोड यांना जोडण्यात येणाऱ्या लिंक रस्त्याची जागा संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. तसेच तिथे काम सुरू करावे. त्यामुळे कुणाल आयकॉन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न लवकर सुटेल. तसेच पिंपळे सौदागरमधील इतर ताब्यात नसलेलया डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागा मालाकांशी प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यांना योग्य तो मोबदला लवकर द्यावा. रस्ते विकसित करावा, अशी सूचना नगरसेवक नाना काटे यांनी केली.
त्यावर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच डीपी रस्त्याबाबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी केल्या. यावेळी स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर अशोक भालकर, उपअभियंता मनोज सेठिया, केशव लावंड, टी.के चव्हाण, स्थापत्य विभागाचे शाखा अभियंता नरेश जाधव आदी उपस्थित होते.
















