- १८ ते ४४ वयोगटाला डोससाठी प्रतीक्षा…
- शहरातील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं. निलख दवाखान्याजवळ, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर मंगळवारी (दि. २९) रोजी वय ४५ वर्षावरील लाभार्थींना ‘कोव्हॉक्सीन’ चा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला डोस १०० व दुसरा डोस १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
तसेच वय ४५ वर्षावरील वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, आर.टी.टी.सी सेंटर, प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, नेहरुनगरउर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, कासारवाडी दवाखाना पिं. चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड, प्रेमलोक पार्क दवाखाना, बिजलीनगर दवाखाना, कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थी क्षमतेनुसार देण्यात येईल.
वरील डोस हे कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ९० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या मंगळवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ९.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.


















