- पालिका आयुक्तांनी दिला इशारा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :-पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक, कर्मचाऱ्यांसह) ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी कामकाज करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहेत.
शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (पेन्शनधारक), मानधनावरील, ठेकेदारीपध्दतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचा-यांनी जर अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल. तर, त्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबतीत लेखा विभागाकडून संबंधितास कळविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
















