न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ३ जाने.) :- रावेत येथील एस. बी. पाटिल ज्यु. कॉलेजमध्ये बारावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या यश वाल्हेकर या विद्यार्थ्याने छ्त्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगीर करुन, सुवर्ण पदक पटकाविले आहे.
संस्थेचे अध्यक्ष लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, भाईजान काजी, गिरीष देसाई, प्राचार्य अनुजा कामठे यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.
या विद्यार्थ्यास कॉलेजचे क्रिड़ा शिक्षक प्रदीप कासार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


















