- काळेवाडी येथील तापकीर शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३ जाने.) :- काळेवाडी तापकीर नगर येथील श्रीमती. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर, सचिव सागर तापकीर, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे, सोमनाथ तापकीर, नितीन पवार, दीपक चौधरी, शिवाजी भांड, रेणुका वर्मा, बापू बल्लाळ, सौदागर केंगारने, शशिकांत रसाळ, बिलाल अत्तार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मच्छिंद्र तापकीर म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा आणि परिवाराचा विचार न करता शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने आज त्यांच्यामुळेच शैक्षणिक क्रांती झाली. त्यामुळेच आज मुली अभिमानाने शिक्षण घेत आहेत. सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घ्यावे.











