- गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी आठ केंद्र राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या रविवारी (दि. ११) रोजी ‘ कोव्हॉक्सीन ’ लसीचा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगररुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय. सी. एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच उद्या वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. याअनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय निळु फुले नाटयगृह, सांगवी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, प्रेमलोक पार्क दवाखाना या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला व दुसरा डोस हा १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या आठ लसीकरण केंद्रावर ५० लाभार्थीचे डोस राखीव ठेवण्यात येत असून लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.