- आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाकडून स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- आत्मशक्ती वाढविण्यासाठी भक्ती गरजेची आहे. निगडीतील भक्ती – शक्ती समूह शिल्पाजवळ उभे राहताना आपोआपच भक्तीची प्रेरणा मिळते, असे मत ओजस्वी वक्ता साध्वी जागृतीजी यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे भक्ती-शक्ती उद्यान चौकात प. पू. साध्वी जागृतीजी आदीठाणा दोन आणि साध्वी वत्सलाजी म.सा. यांचे बुधवारी (दि. ७) स्वागत करण्यात आले.
यावेळी उद्योजक संतोष कर्नावट, आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष जवाहर मुथा, कार्याध्यक्ष सुभाष ललवाणी, सूर्यकांत मुथियान, मोतीलाल चोरडिया, शामसुंदर बोरा, मदन कोचर, विहार सेवक संतोष लुंकड, नितीन बेदमुथ्था, रमणलाल बाफना, राजेंद्र खिवसरा, राजेंद्र छाजेड, मनसुख छाजेड, हिरालाल लुणावत, राजेश कटारिया, नेनसुख मांडोत, दलीचंद शिंगवी, कांतीलाल लूणावत, सुभाष मंडलेचा आदी उपस्थित होते.















