- पोलीसात तक्रारी दाखल करण्याचे काम मात्र सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- उच्च न्यायालयाने ९ जुलै २०२२ पर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला दिलेली स्थगिती आणखी १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना १३ ऑगस्टपर्यंत उसंत मिळाली आहे.
करोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबविण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत शुक्रवारी (दि. ९) पर्यंत होती.
पावसाळ्यात अनधिकृत घरांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत अनधिकृत बांधकामांना उसंत मिळणार आहे. न्यायालयाचे निर्बंध असल्याने महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अतिक्रमण निमुर्लन विभागाच्या वतीने संबंधित पोलिस ठाण्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात येत आहेत.