न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि मधील नैसर्गिक ग्रीन वॉल व्हर्टिकल गार्डन ची सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये नोंद झाली
एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक विश्वदीप राय चौधरी यांनी परीक्षण करून किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड मधील या नैसर्गिक ग्रीन वॉल सर्वात मोठी नेचर वॉल म्हणून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व सन्मान पदक देऊन घोषणा केली
या ग्रीन वॉलची लागवड सन २००९ मध्ये केली गेली होती. जेव्हा कंपनीचे आवारातून पुणे सोलापूर रोडवरील फ्लायओव्हर ची बांधणी झाली त्या फ्लायोवर च्या पायथ्याशी वाघ नाझी वेल याची रोपे समान लागवड करण्यात आली होती. गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीत सदर वेलीने एक विशाल रूप धारण केले १६ हजार स्केअर फुट व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये त्याचे रूपांतर झाले. या अथांग अशा व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये विविध प्रकारचे पक्षी ,सरपटणारे प्राणी, आणि फुलपाखरे इत्यादी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे या व्हर्टिकल ग्रीन वॉल मुळे कंपनी परिसरात तापमान कमी होऊन प्रदूषणास आळा बसलेला आहे.
या वर्टीकल ग्रीन मध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य कौशिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री के श्रीनिवासन या विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट, सदाशिव पाठी, फॅक्टरी मॅनेजर गणेश चौधरी, कंपनीच्या स्टेट अँड इन्व्हरमेंट विभागाचे अधिकारी प्रकाश कुलकर्णी व मंगेश कुलकर्णी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
या कार्यक्रमावेळी एशिया कप रेकॉर्ड विश्वदीप रॉय चौधरी, एसपी कॉलेजच्या बॉटनी विभागाच्या अनुराधा कुलकर्णी, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी तर्फे अमोल राहुल किर्लोस्कर, सदाशिव पाटील गणेश चौधरी, सचिन मजुमदार, प्रकाश कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सौम्य व युनिक लॅबचे कौशल कुलकर्णी उपस्थित होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून अमान राहुल किर्लोस्कर यांनी कंपनीतर्फे सन्मान पदक व प्रमाणपत्र स्विकारले. गणेश चौधरी यांनी आभार मानले.