- दुचाकी, चारचाकी चोरांच्या टोळीसह तब्बल ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- वाकड पोलिसांनी चोरीला गेलेल्या हायवा ट्रकचा (एमएच १४ जीडी १५००) तपास करताना सीसीटीव्ही फूटेज तपासले. देहुरोड व पौडमध्ये याच पद्धतीने चोरी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चोरी करताना चोर इनोव्हा गाडी होते. या गाडीच्या नंबरद्वारे मालकाची माहिती समजली. वारजे आणि हिंजवडीत वाहन चोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे -बंगळुरू हायवे, सुस येथे सापळा लावून इनोव्हा गाडी व आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपी हे वाहनातून जीपीएस सिस्टीम काढून रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत टाकत होते. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, ठाणे, लातूर या ठिकाणावरुन वाहने चोरल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. सात चारचाकी, एक दुचाकी व हैद्राबादमधून हायवा ट्रक तसेच तेलंगानातून एक आयशर टेम्पो असा एकूण ८० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गणेश अर्जुन पुरी (वय २८, रा. चाकुर, जि. लातूर ), प्रकाश नारायण गिरी (वय ३१, रा. हासेगाववाडी, ता. औसा जि. लातूर), कुशल अभिमन्यु जाधव (वय ३२, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी, जि.पुणे), जितेंद्र कृष्णकुमार यादव (वय २२, रा. सांगवी, पुणे ), मुजुब महम्मद शेख (वय ३८, रा. लातूर) व जमशेद ऊर्फ फिरोज युनुस खान पठाण (वय ३८, रा. गालीबनगर, उस्मानाबाद), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.